India Corona Update: देशात कोरोना बाधितांची संख्या 2.46 लाखांवर; 1 लाख19 हजार रुग्ण झाले बरे

India Corona Update: Number of corona cases in the country rises to 2.46 lakh, 9,971 new patients in last 24 hours

एमपीसी न्यूज- देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. भारतात गेल्या 24 तासांत 9,971 नवीन कोरोना रूग्ण आढळले असून दिवसभरात 287 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गातून 1,19,292 लाख रुग्ण बरे झाले आहेत

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आता संक्रमित रूग्णांची संख्या 2.46 लाखांवर गेली आहे आणि मृतांचा आकडा 2629 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली अद्याप कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका बसलेली पडलेली राज्ये आहेत.

देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 1,19,292 लाख लोक बरे झाले आहेत. दरम्यान, 1,20,292 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत, गेल्या 24 तासांत संक्रमणाच्या नवीन घटनांची संख्या 9,887 होती आणि यामुळे 294 मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारी पाहता दररोज रुग्ण संख्या पूर्वीपेक्षा अधिक वाढताना दिसत आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत गुरुवारी सातव्या स्थानी होता, पण रुग्णवाढीमुळे भारत इटलीच्या पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आला आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत.

गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.