India Corona Update: देशातील कोरोना बाधितांची संख्या 32 लाखांवर, 24 तासांत 67,151 नवे रुग्ण तर 1,059 जणांचा मृत्यू

देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. आजवर देशभरात 3 कोटी 76 लाख 51 हजार 512 नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी 8 लाख 23 हजार 992 नमुन्यांची चाचणी ही मंगळवारी (दि.25) करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 32 लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 67 हजार 151 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 1,059 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 32 लाख 34 हजार 475 एवढी झाली आहे. त्यापैकी 24 लाख 67 हजार 759 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 7 लाख 07 हजार 267 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत कोरोना मृतांच्या संख्येत वाढ झाली असून 1,059 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आजवर 59 हजार 449 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. आजवर देशभरात 3 कोटी 76 लाख 51 हजार 512 नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी 8 लाख 23 हजार 992 नमुन्यांची चाचणी ही मंगळवारी (दि.25) करण्यात आली आहे. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून दररोज 50 ते 60 हजार रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत. मंगळवारी देशात 63 हजार 173 जण बरे झाले यासह रिकव्हरी रेट वाढून 76.30 टक्के एवढा झाला आहे. तसेच, मृत्युदर देखील कमी झाला असून तो सध्या 1.84 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक 1 लाख 66 हजार 239 सक्रिय रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.