_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5.66 लाखांवर, मागील 24 तासांत 18,522 नवे रूग्ण, 418 मृत्यू

India Corona Update: Number of corona cases in the country rises to 5.66 lakh, 18,522 new patients, 418 deaths in last 24 hours देशभरात 29 जूनपर्यंत एकूण 86,8,654 नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील 2,10,292 नमूने काल तपासले गेले आहेत.

एमपीसी न्यूज- सलग दोन दिवस 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज हा आकडा काहीसा कमी झाला असून मागील 24 तासांत 18,522 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 418 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 2,66,840 वर जाऊन पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 3,34,822 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या 24 तासांत 13,099 बरे झालेल्या लोकांना घरी सोडण्यात आले आहे.

देशात 2,15,125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 16,893 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरात 29 जूनपर्यंत एकूण 86,8,654 नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील 2,10,292 नमुने सोमवारी तपासले गेले आहेत.

सर्वाधिक रुग्ण असलेली पाच राज्य (कंसात मृत्यू)

महाराष्ट्र – 1,69,883 (7610 )

_MPC_DIR_MPU_II

तमिळनाडू – 86,224 (1141)

दिल्ली – 85,161 (2680)

गुजरात – 31,938 (1827)

उत्तर प्रदेश – 22,828 (672)

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात ‘बायोटेक’ या कंपनीने करोनावरील लस ‘कोवॅक्सिन’ तयार केल्याची सोमवारी घोषणा केली.

आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे. जुलै महिन्यात या लसीची फेज एक आणि दोनमध्ये मानवी चाचणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.