India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, मृतांची संख्या वीस हजारांच्या पुढे

India Corona Update: Number of Corona victims in the country crosses 7 lakh, death toll exceeds 20,000 देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,19,665 वर जाऊन पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज- देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही 20 हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, देशात गेल्या 24 तासात 22,252 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,19,665 वर जाऊन पोहोचली आहे.

यापैकी 4,39,948 रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर 2,59,557 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासात 467 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 20,160 इतकी झाली आहे.


महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वाधिक 2,11,987 रूग्णांची नोंद झाली आहे. पैकी 87,699 सक्रिय रूग्ण आहेत तर 1,15,265 रूग्णांनी कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात 9,026 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेनुसार देशात आजवर 1,02,11,092 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 2,41,430 चाचण्या सोमवारी केल्या आहेत.

देशात पाच दिवसांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले असून सलग चार दिवस प्रतिदिन 20 हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. कोरोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण 6.73 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.