India Corona Update: 24 तासांत विक्रमी 62,538 नव्या रुग्णांची नोंद; रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 67.98 टक्के

India Corona Update: Number of patients in the country exceeds 20 lakh, a record 62,538 new patients registered in 24 hours देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 27 हजार 074 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 तासांत आजवरची सर्वाधिक 62,538 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण रूग्ण संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 886 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत असून. देशात फक्त 21 दिवसांत तब्बल 10 लाख रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज पन्नास हजाराहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 27 हजार 074 एवढी झाली आहे. त्यापैकी 13 लाख 78 हजार 105 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर, 6 लाख 07 हजार 384 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशात आजवर 41 हजार 585 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यापैकी 886 रुग्णांचा मृत्यू हे मागील 24 तासांत झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून देशभरातून काल 49 हजार 769 एवढे लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 67.98 इतकी झाली आहे.

देशात आजवर तब्बल 2 कोटी 27 लाख 24 हजार 134 नमुने तपासण्यात आले आहेत. यापैकी 5 लाख 74 हजार 783 चाचण्या या गुरुवारी (दि.7) ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात पाच ऑगस्टपासून अनलॉक तीनची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याअंतर्गत मॉल्स, लॉज, योगा सेंटर आणि जिम खुली करण्यात आले आहेत.

देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून मोठ्याप्रमाणात रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र, देशाचा रिकव्हरी रेट चांगला असून फार कमी लोकांना कोरोनाची गंभीर लक्षणे असल्याचे दिसून आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.