India Corona Update: देशातील रुग्ण संख्या 5 लाखांच्या उंबरठ्यावर, मागील 24 तासांत 17,296 नवे कोरोनाबाधित

India Corona Update: Number of patients in the country reaches 5 lakh, 17,296 new corona infected in last 24 hours दिल्लीत गेल्या 24 तासात 3,390 रुग्णांची नोंद करण्यात आली असून दिल्लीमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 73,780 वर जाऊन पोहचली आहे.

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. मागील 24 तासांत 17, 296 नवे कोरोना बाधित आढळले असून 407 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 4,90,401 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 4,90,401 रुग्णांपैकी 2,85,637 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 1,89,463 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजवर 15,301 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णापेक्षा अधिक असून मागील 24 तासांत 13,940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्र देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर असून आजपर्यंत 1,47,741 एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून आले आहे.


दिल्लीत गेल्या 24 तासात 3,390 रुग्णांची नोंद करण्यात आली असून दिल्लीमधील एकूण कोरोना बाधितांची संख्या 73,780 वर जाऊन पोहचली आहे.

तमिळनाडूमध्ये सुद्धा रुग्णांची दररोज झपाट्याने वाढ होत आहे. तमिळनाडू 70,977 कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तिथल्या ममता बॅनर्जी सरकारने सशर्त लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये वाढणाऱ्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्या पाहता केंद्र सरकारकडून या राज्यांमध्ये पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची टीम पाठवण्यात येणार आहे.

तेलंगणा राज्यात चाचण्यांचे प्रमाण कमी असले तरी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात अधिक रुग्णांबरोबर अधिक मृत्यूची नोंद केली जात असल्यामुळे ही तज्ज्ञ समिती राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.