India Corona Update: भारतात केवळ 4.16 टक्के सक्रिय कोरोना रुग्णांना ‘व्हेंटिलेटर सपोर्ट’ची गरज

India Corona Update: Only 4.16 percent of corona patients in India need ventilator support भारतात 15.34 टक्के सक्रिय कोरोना रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

एमपीसी न्यूज – भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 7,423 रुग्णांना (4.16 टक्के) व्हेंटिलेटर सपोर्टसह उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 27,317 कोरोना रुग्णांवर (15.34 टक्के) यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तर 28,301 रुग्णांना (15.89 टक्के) ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या  4,56,183 आणि मृतांची संख्या 14,476 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत देशात 465 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे तर 15,968 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा एक दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

23 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 27,317 (15.34 टक्के), त्यापैकी 7,423 रुग्ण  (4.16 टक्के) व्हेंटीलेटर होते आणि 28,301 रुग्णांना (15.89 टक्के) ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, बरे होणाऱ्या कोविड -19 रुग्णांची संख्या दररोज खूप वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 10 हजार 495 कोविड -19  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2 लाख 58 हजार 684 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

जगातील प्रत्येक लाख लोकसंख्येमध्ये सर्वात कमी मृत्यू भारतामध्ये आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) २२ जून रोजी स्थिती अहवाल 415 मध्ये असे नमूद केले गेले आहे की, भारतात कोरोना मृत्यूंचे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमागे एक इतके आहे. जागतिक पातळीवरील सरासरी 6.04 इतकी आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

आयसीएमआरच्या मतानुसार कोरोना नियंत्रणासाठी कठोर चाचणी, ट्रॅकिंग आणि उपचार हा एकमेव मार्ग आहे. संसर्गाचा प्रसार रोखा आणि जीव वाचवा, असा दिला आयसीएमआर या सर्वोच्च वैद्यकीय संस्थेने सर्व संबंधित राज्य सरकारांना, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी दिला आहे.

कोविड -19 चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे.  दरम्यान, काल देशात 2 लाख 15 हजार 195 कोरोना चाचण्या झाल्या. आतापर्यंत भारतात एकूण 73 लाख 52 हजार 911 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.