India Corona Update: 18.55 लाखापैकी 12.30 लाख रुग्ण झाले बरे, गेल्या 24 तासांत 52,050 नव्या रुग्णांची नोंद

India Corona Update: Out of 18.55 lakh, 12.30 lakh patients were cured, 52,050 new patients were registered in last 24 hours मागील 24 तासात देशभरात 803 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 38,938 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – देशात मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आत्तापर्यंत 12.30 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत देशात 52,050 रुग्ण सापडले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 18,55,746 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 5,86,298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 12,30,510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात देशभरात 803 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 38,938 एवढी झाली आहे.

देशातील कोरोना चाचणीची मर्यादा वाढले असून दिवसेंदिवस केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. सोमवारी (दि.3) दिवसभरात तब्बल 6,61,182 नमुने तपासण्यात आले. देशात आजवर 2,08,64,750 नमुने तपासण्यात आले आहेत. आईसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासात देशभरातून 44,306 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट हा 65.77 टक्के एवढा आहे. मृत्यूदर हा कमी झाला असून तो सध्या 2.11 टक्के एवढा आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना विषाणूवर कदाचित लवकर लस सापडणार नाही किंवा कदाचित ती कधीच सापडणार नाही अशी चिंता व्यक्त केली आहे. असे असले तरी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष या चाचणीकडे लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.