India Corona Update: देशातील 23.29 लाखापैकी 16.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त; 24 तासांत 60,963 नवे रुग्ण

India Corona Update: Out of 23.29 lakh patients in the country, 16.39 lakh patients are corona free; 60,963 new patients in 24 hours देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे.

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 60 हजार 963 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 23 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे.

मागील 24 तासांत झालेल्या 834 कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृतांची संख्या 46 हजार 091 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 लाख 29 हजार 639 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 43 हजार 948 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 16 लाख 39 हजार 600 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याची टक्केवारी 70.38 टक्के एवढी झाली आहे. देशातील मृतांची टक्केवारी दोन टक्क्यांपेक्षा खाली घसरली असून ती सध्या 1.98 इतकी आहे. देशात सध्या 27.64 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

देशात आजवर 2 कोटी 60 लाख 15 हजार 297 कोरोनाचे नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 33 हजार 449 चाचण्या सोमवारी (दि.11) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी 80 टक्के रुग्ण हे 10 राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (बुधवारी) विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला.

दहा राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांचे प्रमाण 80 टक्के आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यात या राज्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या राज्यांकडून कोरोना विरुद्ध करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि अनुभवातून कोरोनावर एकत्रितपणे मात करणे शक्य होईल. ही 10 राज्ये जिंकली तर देश जिंकेल असे सांगतानाच कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.