India Corona Update : देशातील 60.74 लाख रुग्णापैकी 50.16 लाख झाले कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 50.16 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 82 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,039 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 60 लाख 74 हजार 703 एवढी झाली असून त्यापैकी 50 लाख 16 हजार 521 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 9 लाख 62 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात मागील 24 तासांत 74 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 82.58 टक्के एवढा आहे. मागील 24 तासांत देशभरात 1,039 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 95 हजार 542 रुग्ण दगावले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.57 टक्के एवढा आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर तब्बल 7 कोटी 19 लाख 67 हजार 230 नमुने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 7 लाख 09 हजार 394 नमुने हे रविवारी (दि.27) तपासण्यात आले आहेत.

देश अद्याप हर्ड इम्युनिटी पासून खूप दूर असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सिरो सर्व्हेबाबत ते बोलत होते. देशात आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा व कर्नाटक राज्यात कोरोनाची पुन्हा लागण झालेले रुग्ण (मुख्यतः डॉक्टर) आढळून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.