India Corona Update : देशातील 65.49 लाख रुग्णापैकी 55.09 झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. भारतातील कोरोनाबाधितांच्या आकडा 65 लाखांच्या पार गेला असून मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील 65.49 लाख रुग्णापैकी 55.09 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासातील वाढीमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 65 लाख 49 हजार 374 इतकी झाली आहे. त्यापैकी 9 लाख 37 हजार 625 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 55 लाख 09 हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1 लाख 01 हजार 782 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात आजवर 7 कोटी 89 लाख 92 हजार 534 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी 11 लाख 42 हजार 131 चाचण्या या मागील 24 तासांत करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

टेस्ट, ट्रेस आणि ट्रिट या त्रिसुत्रीच्या आधारे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. सातत्याने वाढत असलेल्या चाचण्यांची क्षमता हे कोविड-19 संसर्गावर आळा घालण्याचे उत्तम साधन आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोविड-19 चे संकट कायम असले तरी देशात अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. या महिन्यापासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.