India Corona Update: उद्रेक ! 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक 66,999 नवे रुग्ण, 942 जणांचा मृत्यू

India Corona Update Outbreak highest number of 66,999 corona patients in 24 hours सध्या 6,53,622 जणांवर उपचार सुरु आहे. हे एकूण 27.27 टक्के इतके प्रमाण आहे.

एमपीसी न्यूज- देशात एका दिवसात कोरोना विषाणू बाधितांची विक्रमी 66,999 प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर रुग्णांची संख्या वाढून 23,96,638 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 16,95,982 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  देशात बरे होणाऱ्यांची टक्केवारी 70.77 पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता ही आकडेवारी अद्ययावत केली आहे. त्यानुसार मागील 24 तासांत 942 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, देशातील मृतांचा आकडा हा 47,033 इतका झाला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर घटून 1.96 टक्क्यांवर आला आहे.

सध्या 6,53,622 जणांवर उपचार सुरु आहे. हे एकूण 27.27 टक्के इतके प्रमाण आहे. आयसीएमआरनुसार देशात 12 ऑगस्टपर्यंत एकूण 2,68,45,468 नमुन्यांची चाचणी झाली आहे. यामध्ये बुधवारी 8,30,391 नमुन्यांचा समावेश आहे. ही एका दिवसातील चाचण्यांची सर्वाधिक संख्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.