India Corona Update: मागील 24 तासांत तीन लाखांहून अधिक चाचण्या तर 29,429 नवे रूग्ण

India Corona Update: Over 3 lakh tests in last 24 hours, 29,429 new patients आतापर्यंत 5,92,031 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 सर्वाधिक 3,20,161 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजवर देशात 1,24,12,664 चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.

देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत 29,429 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 25 ते 29 हजार नवीन रुग्णांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात सध्या कोरोनाच्या 3,19,840 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5,92,031 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात कोरोनामुळे 24 तासांत 582 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची आकडेवारी 24,309 वर पोहोचली आहे.

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरीही कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत देशातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी केवळ 3.95 टक्के आहे.

त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देऊन डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्यानं काहीसा दिलासाही आहे. याआधी 13 जुलै रोजी सर्वाधिक 28 हजार 178 नवीन रुग्णांची नोंद कऱण्यात आली होती. दरम्यान, 20 हजार 968 रूग्ण बरे झाले हेदेखील एक दिलासा देणारी बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.