India Corona Update: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.49 टक्क्यांवर, मागील 24 तासांत सर्वाधिक 15,413 नव्या रूग्णांची नोंद

India Corona Update: Patient recovery rate at 55.49 per cent, highest 15,413 new patients recorded in last 24 hours देशभरात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत असली तरी, दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

एमपीसी न्यूज- मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल 15,413 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 306 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर 4,10,461 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी 1,69,451 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर 2,27,756 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यामध्ये 13,254 जणांचा समावेश आहे.

देशभरात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत असली तरी, दिलासादायक बाब म्हणजे दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

मागील 24 तासांत 13,925 जण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 2,27,756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, रुग्ण कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ते 55.49 टक्क्यांवर पोहोचले आहे.

देशात केल्या जाणाऱ्या दररोजच्या नमुना चाचण्यांची क्षमता देखील वाढली असून मागील चोवीस तासांत 1,90,730 नमूण्यांची तपासणी केली गेली. आतापर्यंत एकूण 68,7,226 नमूने तपासले गेले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना फायदेशीर ठरत असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्रीय औषध महानियंत्रक विभागाने हेटेरो व सिप्ला या दोन भारतीय औषध निर्माण कंपन्यांना परवानगी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.