India Corona Update: एका दिवसात विक्रमी 75,760 नवे रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 33 लाखांच्या वर

आकडेवारीनुसार देशात सध्या 7,25,991 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ज्याचे प्रमाण 21.93 टक्के आहे.

एमपीसी न्यूज- देशात मागील 24 तासांत कोविड-19 चे विक्रमी 75 हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी एकूण बाधितांची संख्या 33 लाखांपार गेली आहे. तर या विषाणूतून मुक्त होणाऱ्यांच्या संख्येनेही 25 लाखांचा आकडा पार केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत विक्रमी 75,760 नवीन प्रकरणे समोर आली आहे. यामुळे बाधितांची संख्या ही 33,10,234 इतकी झाली आहे. याच कालावधीत 1023 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा हा 60,472 इतका झाला आहे.


देशात आतापर्यंत 25,23,771 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे होण्याचा दर हा 76.24 टक्के इतका झाला आहे. तर मृत्यू दरही घटून 1.83 टक्के झाला आहे.

आकडेवारीनुसार देशात सध्या 7,25,991 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ज्याचे प्रमाण 21.93 टक्के आहे. भारतात 7 ऑगस्ट रोजी संक्रमित रुग्णांची संख्या 20 लाखांच्या वर गेली होती. 23 ऑगस्टला हा आकडा 30 लाखांच्या पुढे गेला.


आयसीएमआरनुसार देशात 26 ऑगस्टपर्यंत 3,85,76,510 नमुन्यांची चाचणी झाली त्यातील 9,24,998 नमुन्यांची चाचणी ही बुधवारी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.