India Corona Update: साडेसात लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त; देशातील रुग्ण संख्या 12 लाखांच्या उंबरठ्यावर

India Corona Update: Seven and a half lakh patients became corona free; The number of patients in the country is on the threshold of 12 lakhs देशात सध्या 4,11,133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. देशात आजवर 7,53,050 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 37,724 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11,92,915 इतकी झाली आहे. त्यापैकी 7,53,050 रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 27,589 रुग्ण निरोगी झाले.

देशात सध्या 4,11,133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात मागील 24 तासांत 648 कोरोना बाधितांची मृत्यू झाला आहे. देशात आजवर 28,732 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आजवर 1,47,24,546 नमूण्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3,43,243 चाचण्या या मंगळवारी (दि.21) करण्यात आल्या आहेत.

भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 63.12% झाला आहे. देशातील सकारात्मकतेचा दर सतत खाली येत असून सध्या तो 8.07 टक्के एवढा आहे.

तसेच, देशातील दर दहा लाख लोकसंख्ये मागे होणारे मृत्यू हा जगात सर्वांत कमी आहे. तो 20.4 असल्याचे आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंह यांनी सांगितले आहे.

तर काही देशांमध्ये हा दर 21 ते 33 टक्के आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका, ब्राझीलनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.