India corona Update: देशात बरे होण्याचे प्रमाण 47.99 टक्के, बाधितांची संख्या सव्वा दोन लाखांच्यावर

india corona update The cure rate in the country is 47.99 per cent, the number of sufferers is over two and a 25 lakh

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 9851 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,26,770 एवढी झाली आहे. गुरुवारी (दि.4) 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील मृतांनी सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 9 हजार 462 रुग्ण बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण 47.99 टक्के आहे. सध्या 1 लाख 10 हजार 960 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशात 273 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे देशात 6348 जणांचा बळी गेला आहे.

देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांत सर्वाधिक वाढ होत असून त्याचबरोबर बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम या राज्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दिल्लीत एक आठवड्यापासून एक हजाराहून जास्त रुग्णांची वाढ होत आहे. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 645 झाली असून त्यापैकी 9542 रुग्ण बरे झाले आहेत.

दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रकृती चिंताजनक असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास भारताने परवानगी दिली आहे. गिलिड सायन्सेस या कंपनीतर्फे हे औषध बनविण्यात येते.

कोरोना रुग्णांवर केलेल्या चाचण्यांत ‘रेमडिसिव्हिर’ औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे निदर्शनास आले होते.

‘रेमडिसिव्हिर’ या औषधाचा समावेश केल्याने भारतात कोरोना प्रतिबंधक उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.