India Corona Update : देशात 24 तासांत सर्वाधिक 14.92 लाख चाचण्या, तर 86 हजार 052 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक 14 लाख 92 हजार 409 नमुने तपासण्यात आले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 86 हजार 052 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58 लाख 18 हजार 571 एवढी झाली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 1,141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण 58 लाख 18 हजार 571 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 9 लाख 70 हजार 116 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, 47 लाख 56 हजार 165 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुळे दगावलेल्या मृतांची संख्या 92 हजार 290 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशभरात मागील 24 तासांत 81 हजार 177 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 81.74 टक्के एवढा झाला आहे तर मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. देशात सध्या 16.67 टक्के सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत आजवरचे सर्वाधिक 14 लाख 92 हजार 409 नमुने तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत देशभरात 6 कोटी 89 लाख 28 हजार 440 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

देशात महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली व आंध्र प्रदेश या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशातील तब्बल 75 टक्के रुग्ण फक्त 10 राज्यात असून बरे झालेल्या रुग्णांपैकी 74 टक्के रुग्ण हे देखील 10 दहा राज्यातील असल्याचे केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.