India Corona Update : मागील 24 तासांत सर्वाधिक 64,399 नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 21 लाखांच्या पुढे

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 68.32 टक्के

एमपीसी न्यूज – सलग तिसऱ्या दिवशी देशात 60 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात आजवरची सर्वाधिक 64,399 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण रूग्णांची संख्या 21 लाखांच्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 21 लाख 53 हजार 011 इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या देशात 6 लाख 28 हजार 741 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 14 लाख 80 हजार 885 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात मागील 24 तासांत 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात जवळपास 43 हजार 369 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 53 हजार 879 जण बरे झाले आहेत. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 68.32 टक्के एवढी झाली आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत सर्वाधिक 7 लाख 19 हजार 364 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. देशात आजवर तब्बल 2 कोटी 41 लाख 06 हजार 535 कोरोना नमुने तपासण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात काल दिवसभरात 12 हजार 822 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 1 लाख 47 हजार 355 सक्रिय रुग्ण आहेत.

देशात काल दिवसभरात आजवरच्या सर्वाधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. काल दिवसभरात तब्बल 7 लाख 19 हजार 364 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दररोज 10 लाख चाचण्या झाल्या पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.