India Corona Update: देशातील सक्रिय रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट 85. 80 टक्यांवर

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात दररोज नव्यानं वाढ होणा-या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. देशात सध्या 8 लाख 83 हजार 185 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 85.80 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत देशभरात 73 हजार 272 नव्या रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 69 लाख 79 हजार 424 एवढी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 83 हजार 185 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आजवर 59 लाख 88 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 926 कोरोना बाधित रुग्ण दगावले आहेत. आत्तापर्यंत देशात 1 लाख 07 हजार 416 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.53 टक्के एवढे खाली आले आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 82 हजार 753 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 8 कोटी 57 लाख 98 हजार 698 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 64 हजार 018 नमुने हे शुक्रवारी (दि.9) तपासण्यात आले आहेत.

देशातील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू व दिल्ली या राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. कोरोनावर प्रभावी लस विकसित करण्यासंबंधी ठिक ठिकाणी लसीच्या चाचण्या सुरू आहेत. कोरोनावरील दोन लसींच्या दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर होणार असून लस नक्की केव्हा उपलब्ध होईल याचं उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.