India Corona Update : देशातील कोरोना बाधितांची संख्या 30 लाखांच्या पुढे, 24 तासांत 69,239 नवे रुग्ण

मागील 24 तासांत देशभरात 912 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 56,706 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशभरात मागील 24 तासांत 69 हजार 239 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या तीस लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मागील 24 तासांत 69 हजार 239 नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 30 लाख 44 हजार 941 इतकी झाली आहे.

त्यापैकी सुमारे 22 लाख 80 हजार 567 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 7 लाख 07 हजार 668 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 912 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 56,706 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून काल दिवसभरात 57 हजार 989 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 74.89 टक्के एवढा झाला आहे. देशभरात रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून ते 1.87 टक्के एवढे आहे.

देशात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढले असून देशात शुक्रवारी (दि.21) तब्बल 10 लाख नमूणे तपासण्यात आले. शनिवारी (दि.22) 8 लाख 01 हजार 147 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. देशात आजवर तब्बल 3 कोटी 52 लाख 92 हजार 220 एकूण कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतात फक्त 15 दिवसात 10 लाख रुग्ण वाढले असून 7 ऑगस्ट रोजी देशात 20 लाख रुग्ण होते. देशात एक लाख लोकांच्या मागे 74.7 लोकांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या 14 या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.