India Corona Update : भारतात कोरोनामुक्त रुग्णसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला

एकूण बाधितांच्या 2.19 टक्के सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – भारताने कोरोनामुक्तीचे अभूतपूर्व शिखर गाठले आहे. कोरोनामुक्त रुग्णसंख्येने एक कोटींचा टप्पा पार केला आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 44 पट अधिक आहे. कोरोनामुक्त रुग्णांपैकी 51 टक्के रुग्ण हे देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यातील आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी 16 हजार 859 एवढी झाली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे. गेल्या गेल्या 24 तासांत 19 हजार 587 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता वाढून 96.36 टक्के झाला आहे. सक्रिय रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यातील अंतर सतत वाढत आहे.

बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण उपचाराधीन रुग्णांच्या 44 पट आहे. देशात सध्या 2 लाख 28 हजार 83 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 2.19 टक्के आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी 51 रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांत केंद्रित आहेत.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.36 टक्के आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे. बाधित रुग्णांची अधिक संख्या असलेल्या देशांचा रुग्ण बरे होण्याचा दर भारताच्या तुलनेत कमी आहे. चाचणी पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारताचा सकारात्मकता दरही खाली आला आहे. सध्या दैनिक सकारात्मकता दर 3 टक्केच्या खाली आहे.

महाराष्ट्र गेल्या 24 तासांत 4 हजार 382 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात काल एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यूची (66 मृत्यू) नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.