India Corona Update : देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

एमपीसी न्यूज – सध्या देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. मात्र अशातही देशात सलग पाचव्या दिवशी नव्या रुग्ण संख्येपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती मिळत आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, 19 सप्टेंबर रोजी 93,337 नव्या रुग्णांची तर 95,880 इतक्या बऱ्या झालेल्या रुग्णांची नोंद आहे. तर त्यानंतर सलग पाच दिवसांनंतरही 23 सप्टेंबर रोजी नव्या रुग्णांची संख्या ही 83,347 आणि 89,746 अशी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

 

दरम्यान, मंगळवारी 22 सप्टेंबरपर्यंत देशभरात 6 कोटी 62 लाख 79 हजार 462 नमून्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने जाहीर केली. देशाचा रिकव्हरी रेट 81.25 टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदर 1.60 टक्के एवढा झाला आहे.

यामुळे आपल्याकडील वैद्यकीय संस्थांना, डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.