India Corona Update : कोरोना रुग्णांची संख्या 1.45 लाखांच्या पुढे तर कोरोनामुक्तांची संख्या 60,491 वर!

India Corona Update: The number of corona patients is over 1.45 lakh and the number of corona free is 60,491!

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 6535 कोरोना रूग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्णांची संख्या 1,45,380 वर जाऊन पोहचली आहे. देशात आजपर्यंत 4167 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जगात कोरोना विषाणूचा जास्त फटका बसलेल्या देशात भारत आता 10 व्या स्थानावर गेला आहे.

भारतात रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 41.60 झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली मध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे तसेच बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिसा राज्यात सुद्धा रूग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. लाॅकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर देशातील रूग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता 10 व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे.

# कोरोना विषाणू आणि काही महत्त्वाचे मुद्दे

# देशात आत्तापर्यंत 60,491 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, देशातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 41.60 झाली आहे.

#  महाराष्ट्रानंतर तमिळनाडूमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसून येत आहेत तर चेन्नई मध्ये सुद्धा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

# आत्तापर्यंत ग्रीन झोन असलेल्या नागालँड राज्यात सोमवारी पहिल्या तीन रुग्णांची नोंद झाली असून हे रूग्ण चेन्नई येथून विशेष ट्रेनने नागालँड मध्ये आले होते.

# देशात काल पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाली असली तरी काही राज्यांनी विमान प्रवेश नाकारल्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला.

# महाराष्ट्र सरकारने मुंबई विमानतळावरून 25 विमानांना प्रवेश व उड्डाणासाठी परवानगी दिली आहे.

#  हिमाचल प्रदेश सरकारने लाॅकडाऊन पाच आठवड्यांनी पुढे ढकलला असून 30 जून पर्यंत त्याच्यात वाढ करण्यात आली आहे.

# जागतिक आरोग्य संघटनेने सोमवार पासून ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या क्लिनिकल ट्रायल वर तात्काळ बंदी घातली आहे.

# कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भारतात अडकलेल्या चीनी नागरिकांना परत आणण्यासाठी चीन सरकारने संकेतस्थळ सुरू केले आहे.

# देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च रोजी लाॅकडाऊन लागू केला होता त्यानंतर तीन वेळा त्याच्यात वाढ करण्यात आली. चौथ्या लाॅकडाऊनची मुदत येत्या 31 मे रोजी संपत आहे.

# कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत 10 व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.