India Corona Update : देशातील बाधितांची संख्या 59 लाखांच्या पुढे, 24 तासांत 85,362 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिक कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशभरात 85 हजार 362 नवे करोनाबाधित आढळले असून, 1 हजार 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता 59 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या 59 लाख 6 हजार 933 वर पोहचली आहे.

देशातील एकूण 59 लाख 3 हजार 933 करोनाबाधितांमध्ये 9 लाख 60 हजार 969 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, कोरोनामुक्त झालेले व डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 48 लाख 49 हजार 58 एवढी आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्या 93 हजार 379 जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत आज सकाळी आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात एकूण 7 कोटी 02 लाख 69 हजार 975 नमूने तपासण्यात आले. त्यातील 13 लाख 41 हजार 535 नमूण्यांची तपासणी शुक्रवारी (दि.25) झाली आहे. आयसीएमआर ने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

मागील 24 तासांत देशभरात 93 हजार 420 उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 82.14 टक्के एवढा आहे तर मृत्यूदर 1.58 टक्के एवढा आहे.

देशातील 75 टक्के रुग्ण हे फक्त10 राज्यांमध्ये असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.