India Corona Update : देशातील बाधितांची संख्या 40 लाखांच्या पुढे, 24 तासांत 86,432 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मागील 24 देशभरात 86 हजार 432 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण बाधितांची संख्या 40 लाखांचा पुढे गेली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 40 लाख 23 हजार 179 एवढी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 46 हजार 395 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील 31 लाख 07 हजार 223 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात मागील काही दिवसांपासून दररोज एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 1,089 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत जवळपास 69 हजार 561 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आतापर्यंत देशभरात 4 कोटी 77 लाख 38 हजार 491 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी शुक्रवारी (दि.4) 10 लाख 59 हजार 346 नमूणे तपासण्यात आले. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. देशात सध्या 1,642 टेस्टिंग लॅब कार्यरत आहेत त्यापैकी 1,026 सरकारी तर 617 लॅब खासगी आहेत.

देशात सध्या 8 लाख 46 हजार 395 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 0.33 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, 2.03 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत तर 3.49 टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. मागील 24 तासांत देशभरात 70 हजार 072 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 77.23 टक्यावर पोहचला आहे तर 1.72 टक्के मृत्यूदर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.