India Corona Update: देशातील बाधितांची संख्या 12 लाखांच्यावर, 24 तासांत तब्बल 1134 जणांचा मृत्यू; 31,875 रुग्ण झाले बरे

India Corona Update: The number of victims in the country is over 12 lakh, 1134 people died in 24 hours; 31,875 patients cured सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तामिळनाडूत 24 तासांत सर्वाधिक 518 रुग्णांचा मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज- देशात कोरोना विषाणूचे थैमान कमी होताना दिसत नाही. भारतातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १२ लाखांच्यावर गेली आहे. देशाची एकूण रुग्ण संख्या ही 12,39,684 इतकी झाली आहे. यात 24 तासांत 45,601 रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर देशात एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. देशात 24 तासांत तब्बल 1130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत एका दिवसांत सर्वाधिक 518 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 280 रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे 24 तासांत 31,875 रुग्ण हे बरे झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा 63.13 टक्के इतका झाला आहे. 

बुधवार ते गुरुवार दरम्यान देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 3,37,607 इतकी झाली आहे. यात 10,576 रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे. राज्यात 1,36,980 सक्रिय रुग्ण आहेत. तर 5,552 रुग्ण हे बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,87,769 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 280 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 12,556 इतकी झाली आहे.

सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तामिळनाडूत 24 तासांत सर्वाधिक 518 रुग्णांचा मृत्यू झाला. तेथील एकूण मृतांचा आकडा हा 3,144 इतका आहे. तामिळनाडूत 5,849 रुग्ण आढळून आले. तामिळनाडूत 1,86,492 रुग्णसंख्या झाली आहे. तामिळनाडूत एकूण 51,765 सक्रिय रुग्ण आहेत. तर 1,31,583 रुग्ण हे बरे झाले आहेत. 24 तासांत 4,913 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.