-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update : संसर्गाचा वेग उतरणीला ! दोन महिन्यांनंतर रुग्ण संख्या एक लाखाच्या खाली

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम असून तब्बल 63 दिवसांनंतर रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 86 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 66 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत 97 हजाराने घट झाली असून ती 13 लाखांवर पोहोचली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 89 लाख 96 हजार 473 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 73 लाख 41 हजार 462 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 82 हजार 282 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 94.29 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सध्याच्या घडीला 13 लाख 03 हजार 702 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 51 हजार 309 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 2 हजार 123 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.21 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 36 कोटी 82 लाख 07 हजार 596 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 73 हजार 485 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 23 कोटी 61 लाख 98 हजार 726 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची घोषणा केली. 18 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn