India Corona Update : देशात दोन लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत दहा हजार नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. मागील 24 तासांत दहा हजार नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, मागील आठ महिन्यातील हि सर्वात निच्चांकी वाढ आहे. रुग्ण वाढ घटल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला दोन लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशभरात मागील 24 तासांत 10 हजार 064 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 1 कोटी 05 लाख 81 हजार 837 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 02 लाख 28 हजार 753 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 228 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 78 लाख 02 हजार 827 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 09 हजार 791 नमून्यांची तपासणी सोमवारी (दि.18) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 17 हजार 411 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 137 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 52 हजार 556 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.