India Corona Update : चिंता वाढवणारी बातमी ! सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 76 लाख 12 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 31 हजार 507 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 36 लाख 45 हजार 164 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मागील 24 तासांत 3 हजार 915 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 34 हजार 083 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.08 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 81.94 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 29 कोटी 86 लाख 01 हजार 699 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 26 हजार 490 चाचण्या गुरुवारी (दि.06) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 16 कोटी 49 लाख 73 हजार 058 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.