India Corona Update : चिंताजनक ! देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर 

गेल्या 24 तासांत 3,68,147 नवे रुग्ण, 3,00,732 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे देशातील कोरोना बाधितांची संख्या दोन कोटींच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तसेच, एकूण मृतांची संख्या 2 लाख 18 हजार 959 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 3 लाख 68 हजार 147 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 732 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 81.77 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 34 लाख 13 हजार 642 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 417 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 18 हजार 959 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.
देशात आजवर 29 कोटी 16 लाख 47 हजार 037 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 04 हजार 698 चाचण्या रविवारी (दि.02) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.