India Corona Update : चोवीस तासांत देशात 31,923 तर, केरळमध्ये 19,675 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – केरळ वगळता भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 31 हजार 923 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली त्यापैकी, 19 हजार 675 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती 187 दिवसातील निचांकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एएनआयने वृत्त प्रसिद्ध केले आहे. प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 35 लाख 63 हजार 421 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 28 लाख 15 हजार 731 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.77 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासात 31 हजार 990 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 3 लाख 01 हजार 640 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 349 कोरोना रुग्ण दगावले असून, भारतात आजवर 4 लाख 46 हजार 050 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 55 कोटी 83 लाख 67 हजार 013 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 27 हजार 443 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 83 कोटी 39 लाख 90 हजार 049 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 71 लाख 38 हजार 205 जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.