India Corona Vaccination News : भारतात 99 दिवसात 14 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज – देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत 99 दिवसात भारतातील आतापर्यंत 14 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. यामुळे कोरोना लस देणारा भारत हा जगातील सर्वात वेगवान देश ठरला आहे.

रविवारी (दि. 25) सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 20,19,263 सत्रांच्या माध्यमातून कोविड लसीच्या 14, 09,16,417 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 92,90,528 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 59,95,634 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,19,50,251 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 62,90,491 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षांहून जास्त वयाच्या 4,96,55,753 लाभार्थांनी लसीची पहिली मात्रा आणि 77,19,730 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील,4,76,83,792 लाभार्थी (पहिली मात्रा),23,30,238 लाभार्थी (दुसरी मात्रा) इतक्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांपैकी 58.83% मात्रा आठ राज्यांत देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 25 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 99 व्या दिवशी (24 एप्रिल 2021) रोजी लसीच्या 25,36,612 मात्रा देण्यात आल्या. देशभरात 25,732 सत्रांतून 16,43,864 लाभार्थ्यांनी पहिली मात्रा तर 8,92,748 लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली.

भारतात कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1,40,85,110 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.05 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात 2,17,113 रुग्ण कोविडमुक्त झाल्याची नोंद झाली.

भारतातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 26,82,751 वर पोहोचली आहे. देशातील एकूण बाधितांपैकी ही सक्रीय रूग्णसंख्या 15.82 % इतकी आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 1,29,811 रुग्णांची वाढ नोंदविण्यात आली.

भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ,एकूण 69.94% सक्रिय रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान,तामिळनाडू, गुजरात आणि केरळ या आठ राज्यात आहेत.

राष्ट्रीय मृत्युदर कमी होत असून तो सध्या 1.13 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात 2,767 मृत्यूंची नोंद झाली. दहा राज्यात 80.23 टक्के नवे मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (676) मृत्यू झाले. त्याखालोखाल दिल्लीत 357 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.