Pune News : हवाई मार्गाने देशभरात 56 कोटी कोरोना लशींचे वितरण, तर परदेशात 2 लाख डोस वितरित

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस वितरण करण्यात येत आहे. केंद्र सरकारने प्रवासी विमानातून लस वाहतुकीला परवानगी दिल्याने पुणे विमानतळ लस वाहतुकीचे ‘हब’ बनले आहे. पुण्यातून विमानाने दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू, हैद्राबाद, कोलकाता यांसह उत्तर अमेरिकेत असलेल्या सुरीनाम सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट गेर्नाडाइन्स, अँटिग्या, बारबुडा, सेंट लुसिया या देशांना पुण्यातून 56 कोटी कोव्हिशिल्ड लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्या पासून कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट येथे येऊन कोव्हिशिल्ड लस उत्पादनाची पहाणी केली.

त्यानंतर लगेचच जानेवारी 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे वाटप वर्षभरात काही ठिकाणी रस्ते वाहतुकीद्वारा झाले, तर काही ठिकाणी पुण्यातील लोहगाव विमानतळावरून करण्यात आले. याकरिता विमानतळ प्रशासनाने कोरोना काळात सर्व बंद असतानासुद्धा एक वेगळी यंत्रणा उभारून कोव्हिशिल्ड लशीची वाहतूक सुरू ठेवली. परिणामी, देशातील बहुतांश नागरिकांना तत्काळ लशीचे डोस मिळाल्यामुळे कोरोनाचा वाढत चाललेला कहर शासनाला काही प्रमाणात रोखता आला.

पुणे विमानतळावरून आतापर्यंत देशभरात कोरोना लशीचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु त्याच बरोबर उत्तर अमेरिकेत असलेल्या सुरीनाम सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट गेर्नाडाइन्स, अँटिग्या, बारबुडा, सेंट लुसिया परदेशात 7 देशांना कोव्हिशिल्डचे 2 लाख डोस रवाना करण्यात आले आहेत.

आतापर्यंत देश-विदेशात लसीचा झालेला पुरवठा – 

  • देशभरात 57 कोटी 40 लाख 97 हजार 100 डोस
  • परदेशात 2 लाख 16 हजार डोस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.