India Lost WC Finals: टीम इंडिया, आम्ही आज आणि सदैव तुमच्यासोबत आहोत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज : विश्व कप स्पर्धेची भारत आणि (India Lost WC Finals) ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम लढत आज पार पडली. यात भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने जेतेपद जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन स्वतंत्र ट्वीट करून भारतीय संघाला धीर दिला तर ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले.

भारतीय क्रिकेट संघाला उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द नोंद घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या जिद्दीने खेळलात, त्याचा देशाला अभिमान आहे. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.