WTC 2021 : भारत-न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून 

एमपीसी न्यूज – भारत आणि न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून (शुक्रवार) साऊथम्पटन येथील मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाच्या मागील झालेल्या मालिकात घवघवीत यश मिळवले आहे तर, न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडला त्यांच्या भूमीवरील कसोटी मालिकेत 1-0 असे नमवले आहे. दोन्हीही संघाचे जड असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर कोण आपले नाव कोरणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

कसोटी क्रिकेटमधील जगज्जेतेपद देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. विविध संघांमधील द्विराष्ट्रीय मालिकांतील गुणपद्धतीनुसार दोन अव्वल संघांमधील अंतिम सामन्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) महत्त्वाकांक्षी योजना आता अंतिम टप्प्यात आहे. विश्वविजेत्या संघाला 16 लाख डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड राहीले आहे. उभय संघात आत्तापर्यंत 59 कसोटी सामने खेळवले गेले असून त्यापैकी भारताने 21, न्यूझीलंडने 12 जिंकले आहेत. तर, 26 सामने अनिर्णीत राहीले आहेत.

भारतीय संघाचे प्लेईग ईलेव्हन 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

न्यूझीलंड संघ प्लेईग (ईलेव्हन अद्याप गुलदस्त्यात)

केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

 सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि एचडी वाहिन्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.