T20 WC : भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमने सामने; T20 वेळापत्रकाची घोषणा

एमपीसी न्यूज – यूएईमध्ये या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. भारतीय संघाचे 24 ऑक्टोबरपासून सामने सुरु होणार आहेत. संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

 

आयसीसीने T20 वर्ल्डकपसाठी यापूर्वीच गट जाहीर केले आहेत. भारताचा समावेश ग्रुप 2 मध्ये असून यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझिलंड हे संघही आहेत. भारत- पाकिस्तानचा सामना हा 24 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझिलंडमध्ये 31 ऑक्टोबरला सामना होणार आहे. भारताचा त्या पुढचा सामना हा 3 नोब्हेंबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.

 

 

 भारताच्या सामन्याचे वेळापत्रक

– 24 ऑक्टोबर – भारत वि.पाकिस्तान

– 31 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझिलंड

– 3 नोव्हेंबर- भारत वि. अफगाणिस्तान

– 5 नोव्हेंबर- भारत वि. क्वॉलिफायर ग्रुप बी विजेता टीम

– 8 नोव्हेंबर- भारत वि. क्वालिफायर ग्रुप ए रनर अप टीम

 

या T20 वर्ल्ड कपमधील पहिला उपांत्य सामना हा 10 नोव्हेंबरला खेळवला जाणार असून दुसरा उपांत्य सामना हा 11 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा 14 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.