Corona Vaccine Update : स्पुटनिक व्ही लसीच्या 30 कोटी डोसचे भारतात उत्पादन

एमपीसी न्यूज : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या 30 कोटी डोसचे भारतामध्ये पुढच्या वर्षी उत्पादन होणार आहे. विविध भारतीय कंपन्यांशी रशियाने स्पुटनिक व्ही लसीच्या डोसच्या उत्पादनाबाबत करार केले असून, त्यामुळे या उत्पादनाचे प्रमाण पूर्वीपेक्षा तिप्पट झाले आहे.

रशियाने विकसित केलेल्या व भारतात उत्पादन केलेल्या स्पुटनिक व्ही लसीची चाचणी दिल्लीतील रशियन दूतावासामध्ये सुरू आहे. ही माहिती रशियाच्या अधिकाऱ्यांनीच ट्विटरवर दिली. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे.

लस उत्पादनाची क्षमता वाढविण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांनी मोठी तयारी केली आहे. जगभरात कोरोना लसींना आगामी काळात प्रचंड मागणी येणार असून, त्यांच्या उत्पादनाचे जास्तीतजास्त काम भारतीय कंपन्यांना मिळावे, असा केंद्र सरकारचाही प्रयत्न आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, हिटेरो बायोफार्मा ही कंपनी स्पुटनिक व्ही या लसीचे 10 कोटी डोस बनविणार असून, त्याबाबतचा करार या आधीच झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.