India : एका दिवशी कोरोनामुक्त होण्याचा विक्रम; आज  देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज

देशातील कोरोनामुक्त होण्याचा दर 72 टक्क्यांपर्यंत गेला आहे. : Record of being corona-free in one day; Today 57 thousand 584 patients are discharged in the country

एमपीसी न्यूज – भारतात दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुक्तीचा विक्रम झाला असून गेल्या 24 तासात देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवरचा ब-या होणाऱ्या रुग्णांचा हा  सर्वाधिक आकडा आहे.

देशातील कोरोनामुक्त होण्याचा दर 72 टक्क्यांपर्यंत गेला आहे. प्रभावी रोग नियंत्रण धोरणाची यशस्वी आणि समन्वित अंमलबजावणी, जलद आणि सर्वसमावेशक चाचणी व गंभीर रूग्णांच्या प्रमाणित   व्यवस्थापनाचा हा सकारात्मक परिणाम आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल (एमओएचएफडब्ल्यू) मध्ये नमूद केल्यानुसार, सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाच्या कोविड-19 रुग्णांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणासाठी भारताने केअर प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली आहे.

त्यामुळे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

अधिक संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. तसेच गृह अलगीकरणाचा (सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेले) कालावधी पूर्ण करणाऱ्या रुग्णांमुळे, भारतातील कोविड-19च्या बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जवळपास 2 दशलक्ष (19,19,842) पर्यंत पोहोचला आहे.

बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील अंतर वाढत आहे. हा आकडा आज 12 लाख 42 हजार 942 इतका आहे.

देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. सध्याच्या कोविड बाधित रुग्णांच्या केवळ 25.57 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णांची लवकर ओळख पटल्याने सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि त्वरित अलगीकरण सुविधा प्रदान करण्यात आणि गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली आहे. यामुळे रुग्णांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन झाले.

देशातील कोविड-19 च्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ते 1.92 टक्क्यांवर पोहोचले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.