New Delhi: भारतात कोरोनाचा दुसरा बळी?

एमपीसी न्यूज – दिल्लीत कोरोनामुळे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. यापूर्वी कर्नाटकात कुलबर्गी येथे कोरोनाबाधित एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.  भारतामध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 81 रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीत मृत्यू झालेल्या महिलेला कफ झाला होता. याआधी तिला मधुमेह होता. तिचा मुलगा इटलीहून परत आला होता. त्याच्यामुळे तिला संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना की मधुमेहामुळे तिचा मृत्यू झाला, हे अजून स्पष्ट झाले नाही.

कोरोनामुळे कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका 76 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. मृत झालेली व्यक्ती 29 फेब्रुवारीला सऊदी अरबच्या जेद्दाहहून परत आली होती. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर या व्यक्तीला नातेवाईकांनी 10 मार्चला हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल केले. चांगल्या उपचारांसाठी कुटुंब रुग्णाला पुन्हा कलबुर्गीला आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.