India : भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानातून पंतप्रधानांनी केले उड्डाण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलोर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) शनिवारी (दि. 25) भेट ( India ) दिली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. त्याचा अनुभव त्यांनी सोशल मिडीयावर शेअर करत ‘हम भी किसीसे कम नहीं’ अशा भावना व्यक्त केल्या.

“तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता, आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना मला देऊन गेला.” असे पंप्रधान म्हणाले.

Nigdi : ओटास्कीम येथे भंगारच्या दुकानाला आग; कोणतीही जीवित हानी नाही

“मी आज तेजसमधून उड्डाण करताना अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आपली मेहनत आणि दृढ निर्धार यामुळे आपण स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासियांचे हार्दिक अभिनंदन.” असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी तेजस लढाऊ  ( India ) विमानाच्या निर्मितीबाबत माहिती जाणून घेतली. बेंगलोर येथील एचएएल मध्ये संरक्षण क्षेत्रातील निर्माण होणा-या बाबींची पाहणी केली. मोदी सरकारने संरक्षण विषयक भारताची सज्जता आणि स्वदेशी यावर भर दिला आहे. त्यामध्ये तेजस विमान देखील समाविष्ट आहे. सन 2016 मध्ये तेजस हे लढाऊ विमान भारतीय संरक्षण दलात दाखल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.