Coronavirus News : भारत खरेदी करणार कोरोना लसीचे 16 कोटी डोस

मोठ्या प्रमाणात लस खरेदी करणारा भारत हा जगातील पहिला देश

एमपीसी न्यूज : भारत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 16 कोटी डोसची खरेदी करणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर डोसची खरेदी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

जगभरात कोरोना लसीला असलेल्या मागणीबद्दल ड्यूक विद्यापीठाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, युरोपीय समुदायाने ३० नोव्हेंबरपर्यंत कोरोना लसीचे १५.८ कोटी डोस खरेदी करण्यासाठी मागणी नोंदविली आहे. अमेरिकेनेही मॉडेर्ना कंपनीबरोबर कोरोना लसीचे १० कोटी डोस खरेदी करण्याचा करार केला आहे.

भारताने कोरोना लसीच्या खरेदीसाठी तीन कंपन्यांबरोबर बोलणी केली आहेत. त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित करण्यात येणाऱ्या लसीचा समावेश आहे. विविध देशांनी मिळून या लसीचे १५ कोटी डोस खरेदीची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय नोवावॅक्स लसीचे १२ कोटी डोस खरेदी करण्यात येतील.

तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना परवानगी
हिपॅटायटीसवर परिणामकारक ठरलेले पेगीहेप हे औषध कोरोना आजार बरा करण्यासाठी उपयोगी ठरेल का, हे पाहण्यासाठी सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पार पाडण्याकरिता झायडस कॅडिला कंपनीला औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत लसीचे १५.८ कोटी डोस खरेदी करण्यासाठी नोंदणी, ५० कोटी कोरोना लसीचे डोस लस उत्पादक कंपन्यांनी येत्या जुलै-ऑगस्टपर्यंत बनवावेत यासाठी भारत त्यांच्या संपर्कात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.