India-UK flights start : भारत ब्रिटन विमानसेवा 6 जानेवारीपासून सुरू

एमपीसी न्यूज : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर खंडित करण्यात आलेली विमानसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भारतातून यूकेला जाणारी विमाने 6 जानेवारीपासून तर यूकेतून येणारी विमानसेवा 8 जानेवारीपासून सुरू होईल.

प्रत्येक आठवडय़ाला 30 विमाने उड्डाणे होतील. त्यांचे वेळापत्रक 23 जानेवारीपर्यंत लागू असेल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले. डीजीसीएने किमान कंपन्यांसाठी लागू केलेल्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही प्रवाशाला ब्रिटन आणि भारत दरम्यान तिसऱया देशाचा प्रवास करता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.