Corona Vaccine Update : भारताला ना नफा ना तोटा या दराने फायझर लस मिळणार

एमपीसी न्यूज : देशासह जगभरात कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहित वेगाने सुरु केली आहे. त्यामुळे लसींची मागणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाढली आहे.

याचदरम्यान आता अमेरिकेच्या फार्मास्युटीकल कंपनी फायझरने भारताला ना नफा  या दराने फायझर लस देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अशी माहिती फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी जाहीर केली.

याबाबत बोलताना फायझर कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी फायझर ही लस नो प्रॉफिटवर  वर देण्याचा प्रस्ताव ठरवण्यात आला आहे. म्हणजेच कोणत्याही नफ्याशिवाय फायझर ही भारताला दिली जाणार आहे. याबाबत भारत सरकारशी बातचीत सुरु आहे. लसीकरण मोहिमेसाठी लस देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

याच दरम्यान कंपनीच्या प्रवक्ताने भारतात अमेरिकेच्या लसीसंदर्भातील जाहीर केलेला एक रिपोर्ट फेटाळून लावला आहे. ज्यामध्ये फायझर कंपनीने लसीचा दर ठरवला आहे. असा दावा करण्यात आला होता. यावर फायझर कंपनीने असे म्हटले आहे की, जगभरात फायझर लस समान आणि स्वस्त दरात पोहचवण्याच्या दिशेने काम केले आहे. विविध देशांसाठी लसीच्या किंमतीचा दर वेगवेगळा आहे. कोरोनाच्या काळात फक्त लसीकरणासाठीच सरकारला समर्थन दिले जाणार आहे. हाच दृष्टीकोन भारतासाठी सुद्धा असणार आहे. असे फायझर कंपनीचे हेच प्राथमिक उद्दिष्ट आहे.

दरम्यान, भारतात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने गेल्या आठवड्यात Moderna, फायझर आणि Johnson & Johnson द्वारे निर्मित करण्यात आलेल्या विदेशी लसीचा भारतात वापर करण्यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे या तीनही लशींना आपत्कालीन वापरासाठी म्हणून भारतात मंजुरी मिळवण्यासाठी भारत सरकारबरोबर चर्चेत सुरु आहे. सध्या भारतात बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरमची कोविशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. या लसी विदेशात सुद्धा पाठवल्या जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.