Chinchwad Crime News : 59 लाखांचा अपहार प्रकरणी इंडियन बॅंकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – 59 लाख 32 हजार 951 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी इंडियन बॅंक, चिंचवड शाखेच्या मॅनेजर आणि सात ते आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळभोर नगर, चिंचवड येथे मंगळवारी (दि.14) हा प्रकार घडला. 

याप्रकरणी राजकुमार घनश्याम गिहाणी (वय 55, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंडियन बॅंक, चिंचवड शाखेचे मॅनेजर लल्लनसिंग, एक मोबाईल नंबर, एक मेल आयडी आणि खात्यावर पैसे जमा करून घेणारे खातेधारक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (क) (ड) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बॅंकेचे मॅनेजर यांना अनोळखी इसमाने फोन करून फिर्यादी राजकुमार गिहाणी यांचा भाऊ कृपाल गिहाणी बोलत असल्याचे सांगितले. या इसमाने वैद्यकीय इमर्जन्सी असल्याचे सांगून वेगवेगळ्या खात्यावर 59 लाख 32 हजार 951 रुपये पाठविण्यास सांगितले त्याबाबत एक मेल देखील पाठवला.

बॅंक मॅनेजर लल्लनसिंग यांनी आलेल्या फोन बाबत खातरजमा न करता फिर्यादी गिहाणी यांच्या परस्पर खात्यावर पैसे पाठवले आणि पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.