WTC Final – यंदाच्या विश्व कसोटी स्पर्धेत सुद्धा भारतीय क्रिकेट संघाची ‘ बॉटलिंग’ परंपरा कायम?

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचे मौक्याचा क्षणी हार मानन्याची (बॉटलिंग) परंपरा यंदाच्या विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही कायम आहे असे दिसून येत आहे. २०२३ च्या चॅम्पिअनस ट्रॉफी नंतर भारताने एकही अशी प्रमुख स्पर्धा जिंकलेली नाही. २०१५ एक दिवसीय विश्वचषक, २०१६ टी-२० विश्वचषक, २०१९ एक दिवसीय विश्वचषक, २०२२ टी-२० विश्वचशक या स्पर्धांमधील उपांत्यफेरीमध्ये भारतीय क्रिकेट संघाची नैराश्यजनक कामगिरी होती तर २०१४ टी-२० विश्वचषक, २०१७ चॅम्पिअनस ट्रॉफी, विश्व कसोटी चषक २०२१ या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात (WTC Final) सुद्धा भारतीय संघाने क्रिकेट चाहत्यांना निराश केले होते.
Pimpri : उद्योगांमुळे राष्ट्रनिर्मिती तर सैन्यामुळे राष्ट्र सुरक्षित – राज्यपाल के. टी. पारनाईक
बुधवार ( दि. ७) पासून चालू झालेल्या विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. परंतु अडखळत्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाने काल भारतावर स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. भारतीय क्रिकेट संघ हा कायम मोठ्या व महत्वाच्या स्पर्धांमधील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतो तर कालच्या सारखेच मौक्याचा क्षणी मनाची शांतता न राखता सामन्यांमध्ये खराब कामगिरी करतो. ही बॉटलिंगची परंपरा काल सुद्धा कायम दिसली.
कसोटी सामन्यांवर पहिल्याच दिवशी नियंत्रण मिळाले तर उरलेले ४ दिवस सोपे जातात. कालच्या कामगिरी नंतर सगळ्यांचा अशा आजच्या दिवसावर आहेत. आजचा दिवस सामना ठरवू शकतो. भारताला आज सुरुवातलीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे बळी घ्यावे लागतील आणि मग भक्कम फलंदाजी करून दुसऱ्या पारीसाठी तयारी करावी लागेल. परदेशी खेळपट्टीवर भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजीसमोर कायम स्वतःचे शस्त्र टाकतात. परंतु बऱ्याच सरावांनंतर ते ह्या कसोटीवर खरे उतरून भारताला विजय देण्याचा प्रयत्न करतील अशी समर्थकांनी अपेक्षा लावली आले.
खेळाडूंकडून आज शांत मानसिकता त्याबरोबरच योग्य आक्रमकता दाखवून ऑस्ट्रेलियावर स्वतःचे वर्चस्व दाखवले पाहिजे. रोहित शर्मा, विराट कोहली त्याबरोबरच रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी पुढाकार घेऊन भारताला विजेतेपद मिळवून द्यावे अशी तमाम भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांची इच्छा आहे. कसोटीत अजूनही ४ दिवस असून भारत नक्कीच सामन्यात स्वतःचे सकारात्मक पुनरागमन करू शकतो असे क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.