Irfan Pathan: …तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही पराभूत नाही – इरफान पठाण

indian crickter Irfan Pathan praises ben stokes after England won test against west indies आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने बेन स्टोक्सने अव्वल स्थान पटकावले.

एमपीसी न्यूज – जर भारतीय संघाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो, असा विश्वास माजी मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केला आहे.

वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताना स्टोक्सने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने दीडशतक (176) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (78) ठोकल्या. दोन्ही डाव मिळून त्याने 3 बळी पण घेतले.

या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली.

जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने बेन स्टोक्सने अव्वल स्थान पटकावले. त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वल स्थान पटकावले.

स्टोक्सची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या यादीत दोन भारतीय खेळाडूंची नावे आहेत. टॉप 5 अष्टपैलूंच्या यादीत रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.