Indian Gave Up Citizenship : पाच वर्षात 6 लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्वाचा केला त्याग

एमपीसी न्यूज – गेल्या पाच वर्षात 6 लाखांहून अधिक भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी (दि.30) लोकसभेत ही माहिती दिली आहे. 2017 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 6 लाख 08 हजार 162 नागरिकांना भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. याउलट केवळ 4 हजार 177 लोकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती आहे. 

संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी स्वरुपात उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हि दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार, एक कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक सध्या परदेशात वास्तव्य करत आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्रींनी मंगळवारी लोकसभेत सांगितलं की गेल्या पाच वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी विनंती केली आहे. त्यामध्ये 4177 नागरिकांचा विनंती अर्ज मान्य करण्यात आला असून त्यांना नागरिकत्व प्रदान करण्यात आलं आहे.

गेल्या पाच वर्षात नागरिकत्व त्याग केलेल्यांची संख्या

2017 – 1 लाख 33 हजार 049

2018 – 1 लाख 34 हजार 561

2019 – 1 लाख 44 हजार 017

2020 – 85 हजार 248

2021 (30 सितंबर पर्यंत) – 1 लाख 11 हजार 287

एकूण 6 लाख 08 हजार 162 नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.