Indian Navy : भारतीय नौदलाचा पहिला आसियान भारत सागरी सराव संपन्न

एमपीसी न्यूज – पहिला आसियान भारत सागरी सराव – 2023 (AIME-2023) सोमवारी (दि. 8 मे) दक्षिण चीन समुद्रात यशस्वीरित्या पार पडला. (Indian Navy) या बहुपक्षीय नौदल सरावाच्या सागरी टप्प्यात नऊ जहाजे आणि सुमारे 1400 जवानांनी भाग घेतला.

Pune : पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भारतात तयार केलेली आणि स्वदेशी बनावटीची विनाशिका आयएनएस दिल्ली आणि आयएनएस सातपुडा, सागरी गस्ती विमान P 8I आणि अविभाज्य घटक असलेली हेलिकॉप्टर्स यांनी ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आसियान देशांच्या नौदलाच्या जहाजांबरोबर सराव केला.

समुद्रात झालेल्या दोन दिवसीय टप्प्यात विविध प्रकारच्या सामरिक कसरती, हेलिकॉप्टरद्वारे क्रॉस डेक लँडिंग, नाविकांची प्रात्यक्षिके आणि इतर सागरी कारवायांसह विस्तृत प्रात्यक्षिके सादर झाली. (Indian Navy) सागरी क्षेत्रामधील कौशल्ये आत्मसात करण्याव्यतिरिक्त या सरावाने आंतरकार्यक्षमता वाढवली आणि या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी भारतीय आणि आसियान देशांच्या नौदलाची एकात्मिक शक्ती म्हणून कार्य करण्याची क्षमता प्रदर्शित केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.