Indian Railway Infrastructure: वर्षभरात 562 कि.मी. लांबीची लोहमार्ग बांधणी तर 5,782 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण

  • वर्ष 2019-20 दरम्यान भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासावर दिला भर
  • सीएपीईएक्स निधीतून 1,46,507 कोटी रुपयांचा वापर
  • अंदाजे 562 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांचे आणि 5,622 कोटी रुपये खर्चाचे 15 महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले आणि आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये त्यापैकी 13 प्रकल्प कार्यान्वित
  • वर्षभरात एकूण 5,782 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण
एमपीसी न्यूज – वर्ष 2019-20 मध्ये भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. वर्ष 2019-20 मधील सुधारित अर्थसंकल्पातील 1,61,351 कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे वाटप हे 2018-19 च्या तुलनेत 20.1 टक्क्यांनी अधिक आहे. मार्च 2020 च्या अखेरीपर्यंत 1,46,507 कोटी रुपयांचा निधी खर्च केला असून तो एकूण वाटपाच्या 90.8 टक्के इतका आहे. वर्ष 2030 पर्यंत 50 लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह 2019 च्या अर्थसंकल्पात रेल्वेला देशाच्या विकासाचे इंजिन बनविण्यासाठी पथदर्शक योजना नमूद करण्यात आल्या आहेत. असे रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

वर्ष 2019-20 मध्ये हाती घेण्यात आलेली काही महत्वपूर्ण कामे खालीलप्रमाणे आहेत.

नवीन मार्ग (एनएल), दुपदरीकरण (दिएल), गेज रूपांतरण (जीसी)

नवीन मार्ग, दुपदरीकरण आणि गेज रूपांतरण वर्ष 2019-20 मध्ये वाढून 2,226 किलोमीटर इतके झाले जे वर्ष 2009-14 या कालावधीतील (1,520 किलोमीटर/वर्ष) अंदाजे पूर्ण झालेल्या वार्षिक कामांच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांहून अधिक आहे. वर्ष 2019-20 दरम्यान नवीन मार्ग, गेज रूपांतरण आणि दुपदरीकरणाच्या प्रक्लापावर एकूण 39,836 कोटी रुपये खर्च झाला आहे जो भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये रेल्वेने एकट्या दुपदरीकरणाच्या प्रकल्पांसाठी 22,689 कोटी रुपये केला आहे, जो 2009-14 मधील कालावधीच्या सरासरी वार्षिक खर्चापेक्षा (2,462 कोटी रुपये) 9 पट जास्त आहे. वर्ष 2019-20 मध्ये 1458 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरणाचे काम कार्यान्वित झाले जे 2009-14 मधील कालावधीच्या सरासरी वार्षिक क्रीयान्वयानापेक्षा (375 किलोमीटर/वर्ष) अंदाजे 4 पटींनी अधिक आहे.

15 अति महत्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित: रेल्वेने प्रकल्पाचे महत्त्व, प्रगतीची स्थिती इत्यादींवर आधारित अतिमहत्वपूर्ण प्रकल्पांच्या दुपदरीकरण प्रकल्पांच्या प्रगतीला प्राधान्य दिले होते. लक्ष केंद्रित प्रयत्नांमुळे, सुमारे 562 किलोमीटर लांबीचे आणि 5,622 कोटी रुपये खर्चाचे 15 महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले आणि आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये त्यापैकी 13 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

ईशान्येकडील महत्वपूर्ण प्रकल्पांचे क्रियान्वयन:

o          त्रिपुरामध्ये 112 किलोमीटर लांबीचा नवीन राष्ट्रीय प्रकल्प, “आगरतळा-सबरूम” आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान कार्यान्वित झाला.

o         लुमडिंग ते होई पर्यंत 45 किलोमीटर लांबीचा दुपदरीकरण प्रकल्प पूर्ण व कार्यान्वित झाला.

रेल्वे विद्युतीकरण

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण 5782 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली असून त्यापैकी 4378 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांच्या 31 मार्च 2020 पर्यंत विद्युतवाहतुकीचे काम चालू केले आहे.

2019-20 मधील महत्वपूर्ण प्रकल्पांची पूर्तता:

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1273 किलोमीटर लांबीच्या एकूण 28 प्रकल्पांची कामे पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

  • राजस्थानातील थायियतहामीरा-सानू येथून 58.5 किमी लांबीचा नवीन मार्ग प्रकल्प
  • बिहारमधील छपरा ग्रामीण ते खैराली पर्यंत 10.7 किमी लांबीचा बायपास मार्ग
  • बिहारमधील इस्लामपूर-नाटेसरसह राजगीर-हिसुआ-तिलैया येथून 67.07 किमी लांबीचा नवीन मार्ग प्रकल्प
  • बिहारमधील हाजीपूर-रामदयालु नगर येथून 47.72 किमी लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • हरियाणा आणि राजस्थानमधील जयपूर-रिंगस-सीकर-चूरू आणि सीकर-लोहारू कडून 320.04 किमी लांबीचा गेज रूपांतरण प्रकल्प
  • दिल्लीत 7 कि.मी. लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प (7 कि.मी. लांबी परंतु नवी दिल्ली स्टेशनची गर्दी कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा) नवी दिल्ली ते टिळक पुला दरम्यान (5वी आणि 6 वी लाईन)
  • कृष्णापट्टनम बंदराला जोडणारा आंध्र प्रदेशातील 113 कि.मी. लांबीचा नवीन लाइन बंदर कनेक्टिव्हिटी प्रकल्प
  • उत्तरप्रदेश मधील मधील मेरठ-मुझफ्फरनगर येथून 55.47 किमी लांबीचे दुपदरीकरण
  • मध्य प्रदेशातील कटनी यार्डला बायपास करत जुखी कोर्ड लाइन नावाचा 2 किमी लांबीचा बायपास मार्ग
  • पश्चिम बंगालच्या सियालदहच्या उपशहरी भागातील 1.67 कि.मी. लांबीचा अलीपूर-माईल 5बी नामक दुपदरीकरण प्रकल्प.
  • महाराष्ट्रातील दौंड-मनमाड मार्गावरील प्रलंबित  दौंड चोरड नावाचा 1.025 किलोमीटर लांबीचा बायपास कनेक्टिव्हिटी मार्ग.
  • छत्तीसगडमधील खरसिया-कोरीछापार येथून 42.57 किमी लांबीचा नवीन कोळसा मार्ग प्रकल्प
  • बिहारमधील बख्तियारपूर-बार नावाच्या 19 कि.मी. लांबीचा कोळसा प्रकल्प बारह एनटीपीसी थर्मल पॉवर हाऊसपर्यंत कोळशाच्या वाहतुकीस सोयीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला.
  • पश्चिम बंगालमधील अंदुल-बाल्टिकुरी येथून 7.25 किमी लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • राजस्थानातील अबू रोड ते स्वरूपगंजपर्यंत 26 कि.मी. लांबीचा दुपदरीकरण प्रकल्प
  • राजस्थानातील अबू रोड ते सारोत्रा रोडपर्यंत 23.55 किमी लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • पश्चिम बंगालमधील मोहशिल्ला-कालीपहारीकडून 2.86 किलोमीटर लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • बिहारमधील पीरपैंती-भागलपूर येथून 51.07 किलोमीटर लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • पश्चिम बंगालमध्ये कंकनारा-नैहाटी नावाचा 2.62 किमी लांबीचा चौथा मार्ग प्रकल्प
  • राजस्थानमध्ये 60.37 किमी लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • महाराष्ट्रात मुदखेड-परभणी नामक 81.43 कि.मी. लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प
  • मध्य प्रदेशातील 7 कि.मी. लांबीच्या दुपदरीकरण प्रकल्पाचे नाव सोनतालाई-बगरातावा
  • मध्य प्रदेशातील 25 कि.मी. लांबीच्या अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्पाचे नाव इटारसी-बुधनी असे आहे
  • उत्तरप्रदेश मध्ये 8 कि.मी. लांबीच्या अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्पाचे नाव बिली – चोपान आहे.
  • हरियाणा आणि दिल्ली येथे 34 किलोमीटर लांबीच्या अति महत्वपूर्ण 4 थ्या मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला तुगलकाबाद – पलवल हे नाव देण्यात आले
  • आंध्र प्रदेशातील 41 कि.मी. लांबीच्या अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्पाचे नाव काळू – गुंटकाल
  • आसाममधील लुमडिंग ते होजईपर्यंत 44.92 किमी लांबीचा अति महत्वपूर्ण दुपदरीकरण प्रकल्प

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.